विमानतळांवर वॉर रूम उभारा, दिवसातून तीन वेळा रिपोर्ट करा

गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील अनेक विमानतळांवर प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. धुरक्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली तर अनेक उड्डाणे इतरत्र वळवावी लागली. गोव्यावरून दिल्लीला जाणारे विमान मुंबईला उतरवावे लागले. या सर्व मनस्तापानंतर आज मंगळवारी नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पंबर कसली. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या सहा विमानतळांना वॉर रूम उभारण्याचे तसेच दिवसातून विमानतळावरील विविध समस्या आणि उड्डाणांच्या निश्चितीबाबत दिवसातून तीनवेळा रिपोर्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या दोन दिवसांत अनेक विमान उड्डाणे 12 ते 15 तास विलंबाने सुरू होती. त्यामुळे इंडिगो विमानातील एका प्रवाशाचा संयम सुटला आणि त्याने सहवैमानिकाला मारहाण केली. तसेच विविध ठिकाणी प्रवाशांना जमिनीवर बसून जेवण करावे लागले. त्यांना सोयीसुविधा न मिळाल्याच्या तक्रारी अनेकांनी केला. त्यामुळे अखेर आज मंगळवारी नागरी उड्डाण मंत्रालयाने मुख्य विमानतळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

विमानतळांवर सीआयएसएफ अर्थात पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पुरेसे मनुष्यबळ 24 तास कार्यरत आहे की नाही याची खातरजमा करण्याचे निर्देशही नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व विमानतळांच्या प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर धुरक्यामुळे विमान उड्डाणांबाबत निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पेंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याप्रकरणी विविध प्रकारचे निर्देश तसेच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

इंडिगो आणि मुंबई विमानतळाला नोटीस
1. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस बजावली. दोन्ही नोटिसांच्या बाबतीत विमान वाहतूक मंत्रालयाने तातडीने उत्तर देण्यास सांगितले आहे. उत्तर न दिल्यास आर्थिक दंडासह कार्यवाही करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

2. मुंबई विमानतळावरील डांबरी रस्त्यावर प्रवासी जेवत असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पेंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यानंतर कारवाई करण्यात आली. दरम्यान, घडल्या प्रकाराबाबत इंडिगो विमान पंपनीच्या प्रशासनाने माफी मागितली होती. तसेच भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेऊ असेही म्हटले होते.