रिलायन्सच्या शेअरधारकांची चांदी; कंपनीची 5 दिवसात 26000 कोटींची कमाई…

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरधारकांची चांदी झाली आहे. या कंपनीने गेल्या पाच दिवसात जबरदस्त कमाई केल्याने शेअरधारकांना चांगलाच फायदा झाला आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात रिलायन्सच्या गुतंवणूकदारांनी 26000 कोटींची कमाई केली आहे.

शेअर बाजारात देशातील 10 अव्वल कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली. तर चार कंपन्यांची मार्केट कॅप जबरदस्त वाढली आहे. या चार कंपन्यांमध्ये रिलायन्स आघाडीवर आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे. रिलायन्सचे कॅपिटलायजेशन गेल्या आठवड्यात वाढून 16,19,907.39 कोटी रुपये झाले आहे. आधीच्या तुलनेत त्यात 26,014.36 कोटींची वाढ झाली आहे.

एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 20,490.9 कोटी वाढून 11,62,706.71 कोटी रुपये झाले आहे. भारती एअरटेलच्या गुतंवणूकदारांनी या काळात 14,135.21 केटींची कमाई केली आहे. कंपनीचे मार्केट कॅप वाढून 5,46,720.84 कोटी झाले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट कॅपमध्ये 5,030.88 कोटींची वाढ झाली आणि तो 6,51,285.29 कोटींवर पोहचला आहे.