24 तासांत 150 कोटींचे फटाके फुटले, मुंबईत प्रदूषणाचा स्फोट; पालिकेचा बार फुसका

मुंबईतील हवेच्या प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांची दिलेली वेळ आणि महापालिकेच्या 24 वॉर्डात नेमलेल्या 95 पथकांची कारवाई केवळ कागदावर उरली. मुंबईत आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत पहाटेपासून फटक्यांचा धूमधडाका सुरू राहिला. मुंबईत 24 तासांत तब्बल 150 कोटींचे फटाके फुटले आहेत. त्यामुळे प्रदूषणाचाही स्पह्ट झाला आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता कमालीची खाली आली असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीत रात्री 8 ते 10 या दोन तासांत फटाके पह्डण्याचे निर्देश दिले आहेत, तर पालिकेने कठोर नियमावली जाहीर केली आहे. हवेत असलेल्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. बांधकामांच्या ठिकाणाहून उडणारी धूळ प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याने पालिकेने बांधकामांची ठिकाणे बंदिस्त करणे, पाण्याचा फवारा मारणे असे निर्देश दिले आहेत. याचबरोबर कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱया विषारी धुरामुळे प्रदूषणाची घातकता वाढत असल्यामुळे कचरा जाळण्यास आणि शेकोटी पेटवण्यास बंदी घातली असून 27 निर्बंध घालून देण्यात आले आहेत. नियम मोडणाऱयांवर धडक कारवाईदेखील करण्यात येत आहे.

मुंबईत रविवारी सकाळी हवेची गुणवत्ता

विभाग हवेची गुणवत्ता
बीकेसी 140
बोरिवली 135
मालाड 134
अंधेरी 119
भांडुप 103
वरळी 87

(मुंबईतील रविवारी हवेची एकूण सरासरी गुणवत्ता 125)

आवाज घटला, धूर वाढला

मुंबईत कानठळय़ा बसवणाऱया आवाजाच्या फटाक्यांमध्ये मोठी घट झाली आहे. बॉम्ब, सुतळी बॉम्ब, रॉकेट याच्यापेक्षा विविध रंगांनी आकाश उजळून आतषबाजी करणारे फटाके अधिक प्रमाणात फोडले जात आहेत. हेच फटाके जास्त हवा प्रदूषित करतात असा तज्ञांचा दावा आहे.

400 कोटींच्या फटाक्यांची विक्री

मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या दुकानांची संख्या वाढली आहे. फटाके खरेदीसाठीही झुंबड उडत आहे. आतापर्यंत सुमारे 400 कोटींच्या फटाक्यांची विक्री झाली असून पुढच्या तीन दिवसांत हा आकडा 600 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा फटाक्यांची जास्त उलाढाल होत असल्याचे फटाका विव्रेता संघटनेने सांगितले.