NASAच्या उपग्रहानं टिपला विक्रम लँडरचा फोटो

Chandrayaan-3-lander-pic-by-NASA

अमेरिकन अंतराळ संस्था NASA च्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने अलीकडेच चंद्रावर हिंदुस्थानची तिसरी मोहीम चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचा फोटो घेतला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या स्पर्श करणारे हे पहिले अंतराळ यान आहे आणि चंद्रावर ऐतिहासिक लँडिंगच्या अवघ्या चार दिवसांनंतर म्हजेच 27 ऑगस्ट रोजी LRO ने हा फोटो घेतला होता.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर इमेज शेअर करताना नासाने लिहिलं की, ‘LRO स्पेसक्राफ्टने अलीकडेच चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 लँडरचा फोटा काढला आहे.’

नासाच्या म्हणण्यानुसार, चार दिवसांनंतर LRO कॅमेऱ्याने लँडरचा 42-डिग्री स्ल्यू अँगल मध्ये फोटो काढला आहे.

वॉशिंग्टनमधील एजन्सीच्या मुख्यालयातील सायन्स मिशन डायरेक्टरेटसाठी ग्रीनबेल्ट, मेरीलँड येथील नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरद्वारे LRO व्यवस्थापित केले जाते.

दरम्यान, हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था मंगळवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून चांद्रयान-3 विक्रम लँडरचा त्रिमितीय ‘अ‍ॅनाग्लिफ’ फोटो प्रकाशित केला.