गुरुग्राममध्ये वीजवाहिनी पडल्याने राष्ट्रीय महामार्ग ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुग्राममधील नरसिंगपूरजवळ राष्ट्रीय महामार्ग-48 वर 11 हजार व्होल्टची उच्चदाबाची वीजवाहिनी तुटून रस्त्यावर पडल्याने शनिवारी सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक तातडीने थांबवली. नरसिंगपूर ते खेरकी दौला टोल आणि राजीव चौक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वीज विभागाने तातडीने वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले. दरम्यान, पोलिसांनी काही वाहने पर्यायी मार्गाने वळवली असून दिल्लीकडे जाणाऱया वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.