सावधान… कोरोना हातपाय पसरतोय! देशात जेएन 1 चे एकूण 197 रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 4565 वर

देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंताही वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात 573 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 4,565 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण कर्नाटक आणि दुसरा हरियाणामधील आहे. तसेच जेएन.1 या कोरोना व्हेरिंएटचा प्रादूर्भावही देशात वाढत आहे. गेल्या 24 तासात देशभरात जेएन.1 चे 18 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या सक्रीय जेएन.1 रुग्णांची संख्या 197 झाली आहे.

देशातल्या दहा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत जेएन 1 चे रुग्ण आढळळे आहेत. केरळमध्ये 83, गोव्यात 51, गुजरातमध्ये 34, कर्नाटकमध्ये 8, महाराष्ट्रात 7, राजस्थानमध्ये 5, तमिळनाडूत 4, तेलंगणात 2 ओडिशा आणि दिल्लीत प्रत्येकी एक जेएन 1 रुग्ण आढळला आहे. नोव्हेंबरमध्ये जेएन 1 रुग्णांची संख्या 17 होती,ती डिसेंबरमध्ये 179 झाली. आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी यात 18 रुग्ण वाढून ही संख्या आता 197 वर गेली आहे. देशात रविवारी 636 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर त्यात 14 जेएन 1 रुग्ण होते. त्यामुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंताही वाढली आहे.