आज नीट परीक्षा; ड्रेसकोड लागू

MBBS Exam

मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा 5 मे रोजी देशभरात होणार आहे. या परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजेंसीने (एनटीए) नियमावली आणि ड्रेसकोड जारी केले आहेत. त्यानुसार हाफ शर्ट, टीशर्ट, स्लीपर घालण्याची परवानगी आहे. मुले फुल्ल शर्ट घालून या परीक्षेला बसू शकत नाही. तर विद्यार्थिनींना ज्वेलरी, हाय हिल सँडल घालण्याची परवानगी नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रिक गॅजेट जवळ बाळगण्याची परवानगी नाही. परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. देशभरातील 557 परीक्षा केंद्रावर आणि बाहेरील 14 शहरामध्ये ही परीक्षा होणार आहे.