नवीन संसद भवनाची ओळख ‘पार्लमेंट हाऊस ऑफ इंडिया’

देशाचे स्वातंत्र्य, संविधानाची निर्मिती,  अनेक महत्त्वाचे कायदे यांचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक जुन्या संसद भवनाला आज ‘गुडबाय’ करण्यात आले. संसद भवनाच्या नवीन वास्तूत कामकाजाचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे. नवीन संसद भवनाची ओळख आता ‘पार्लमेंट हाऊस ऑफ इंडिया’ अशी असणार असून, मोदी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे ‘इंडिया’ नको, भारतच हवा, असा आग्रह धरणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारनेच हे नामकरण केले आहे. नवीन संसद भवनाची इमारत देशातील 140 कोटी जनतेच्या आशा-आकांशाचे प्रतीक बनेल, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

जुने संसद भवन ‘संविधान सदन’

तब्बल 96 वर्षांची साक्षीदार असलेली जुन्या संसद भवानाची इमारत जतन केली जाणार असून ‘संविधान भवन’ म्हणून ती ओळखली जाईल.

चार मजली त्रिकोणी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे ‘पार्लमेंट हाऊस ऑफ इंडिया’ असे नामकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे ‘इंडिया’ नावाला विरोध करणाऱ्या भाजप सरकारने हे नामकरण केले आहे.