धारावीत घराचा भाग कोसळला; तिघे जखमी

प्रातिनिधीक फोटो

मुंबईत पावसाची सुरुवात झाल्यापासून दुर्घटनांचे सत्र सुरू असून शनिवारी रात्री धारावी येथील एकमजली घराचा भाग कोसळला. या दुर्घटनेत तिघे जण जखमी झाले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिली.

धारावीतील शताब्दीनगर, धारावी बस डेपो, मनोहर जोशी कॉलेजजवळ एकमजली घर आहे. या घराचा काही भाग शनिवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले. हुसेन सय्यद जावेद (73), अंकित पटेल (29) आणि शिव सन्नापा (39) या तिघा जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिली.