विमानाच्या शिडीवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू

विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानाची दारे बंद आहेत का, याची तपासणी करण्यास गेलेला सुरक्षा अधिकारी शिडीवरून पडून मृत्युमुखी पडल्याची घटना लोहगाव विमानतळावर घडली. सुरक्षेची योग्य काळजी न घेता या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी एअर एशिया विमान कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थापकांविरुद्ध विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

एस. अजय हरिप्रसाद (रा. लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे, तर विवियन अँथोनी डोमनिक (वय 33, रा. लोहगाव, मूळ रा. तामिळनाडू) असे मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा अधिकाऱयाचे नाव आहे. 13 एप्रिल रोजी ही घटना घडली.