फिनलँडमध्ये मुलाचा शाळेत गोळीबार

 

फिनलँडमध्ये एका 12 वर्षीय मुलाने शाळेत गोळीबार केला. यात 1 विद्यार्थी ठार झाला असून अन्य दोन जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱया 12 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. गोळीबाराच्या घटनेने शाळेत धावाधाव झाली. लायसन्स असलेली हँडगन ही गोळीबार करणाऱया विद्यार्थ्याच्या नातेवाईकाची आहे. गोळीबार केल्याचे विद्यार्थ्याने मान्य केले, परंतु गोळीबार कशामुळे केला, हे अद्याप सांगितले नाही. या गोळीबाराच्या घटनेनंतर फिनलँडमध्ये एक दिवसाचा शोक व्यक्त करण्यात आला.