राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी

हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती आज मुंबईसह राज्यभरात मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने प्रत्येक शाखेत, विभागात शिवजयंती सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मुख्य सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. शिवस्तुती आणि शिवरायांच्या अखंड जयघोषाने अवघे आसमंतच दुमदुमून गेले होते.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवपूजन

भारतीय कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ शिवजयंती उत्सव सोहळा मोठय़ा जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी 8 वाजता वेदमंत्रांच्या घोषात शिवप्रतिमेवर जलाभिषेक करण्यात आला. महामार्गावरील शिवपुतळ्याचा परिसर भगव्या झेंडय़ांनी सुशोभित करण्यात आला होता. यावेळी पोवाडे आणि दांडपट्टा चालवण्याची प्रात्यक्षिके सादर केली.

शिवजयंती सोहळ्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते अॅड. अनिल परब, शिवसेना नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, उपाध्यक्ष विनोद घोसाळकर, सरचिटणीस सचिन अहिर, गुरुनाथ खोत, आमदार ऋतुजा लटके, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, महेश सावंत, कार्यक्रमाचे आयोजक व भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम, रजनी मेस्त्राr, प्रमोद सावंत, मनोहर पांचाळ, नितीन डिचोलकर, समीर साबे आदी उपस्थित होते तसेच मुंबई विमानतळ प्रशासनाचे ईआरजीएम राजेश म्हात्रे, सीएचओ राजीव चावला, एजीएम मुकेश शर्मा तसेच एअरपोर्टमधील सर्व पंपन्या व एअरलाईन्स व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, मयूर वणकर, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, पोपट बेदरकर, प्रमोद गावकर, विजय वालावलकर, विजय धामणे, सहचिटणीस जगदीश निकम, मिलिंद तावडे, विजय शिर्पे, संजीव राऊत, विजय तावडे, नीलेश ठाणगे, विनायक शिर्पे, दिनेश पाटील, दिनेश परब उपस्थित होते.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पांजरापोळ, चेंबूर येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ास पुष्पहार अर्पण करताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई दिसत आहेत. यावेळी उपनेते स्मारक समिती सचिव सुबोध आचार्य, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभाग संघटक पद्मावती शिंदे, आमदार प्रकाश फातर्पेकर, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा संघटक निमिष भोसले, महेंद्र नाकटे, संजय नटे, विनायक तांडेल, आनंद जाधव, राजेंद्र पोळ, अरुण हुले, सुरेश लांडगे, किरण लोहार, प्रशांत म्हात्रे, प्रभाकर भोगले, एकनाथ पवार, अनिल पाटणकर, श्रीकांत शेटये, अंजली नाईक, निधी शिंदे, ऋतुजा तारी, रामदास कांबळे उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक 215 व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ( ताडदेवचा राजा) यांच्या वतीने शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, शाखा प्रमुख सिद्धेश माणगावंकर, शाखा सांघटिका सुप्रिया शेडेकर, मंडळाचे अध्यक्ष अशोक संडिम, उपाध्यक्ष रमेश जाधव तसेच शिवसैनिक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस बाबी देव यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आर. के. यादव यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबई मंडळ रेल प्रबंधक रजनीश गोयल, मध्य रेल्वेचे अधिकारी सुनील बैरवादेखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत कमकर, अमोघ निमसुडकर, विकास पाटील, तुकाराम कोरडे, गायकर, मोकाशी, नावळे, शैलेश कांबळे, प्रधान, मित कुमार, सचिन जोशी, अभय वर्तक, संजय चव्हाण, तिरुमालेश, स्वप्नील झेमसे यांनी प्रयत्न केले.

भारतीय कामगार सेना युनिट हॉटेल आयटीसी मराठा सहार येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. भारतीय कामगार सेनेतर्फे संयुक्त सरचिटणीस संजय कदम, चिटणीस संतोष कदम, मयूर वणकर, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, सहचिटणीस विजय शिर्पे, मिलिंद तावडे, दिनेश पाटील व कमिटीतर्फे अध्यक्ष विजय तावडे, सरचिटणीस संजय जाधव, मुमताज खान, सुरेश खरात, रूपेश कहाणे, किरण वझे, अजय पुरेबिया, उमेश शिंदे व कामगार उपस्थित होते.