महाजन, तोंड  सांभाळून बोला

गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, जिह्यातील शेतकऱयांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, शेतकऱयांना शासकीय अनुदान मिळाले नाही,पोखरा योजनेचा लाभ मिळालेला नाही, गिरणा बलून बंधाऱयासाठी निधी मिळवू शकलेले नाहीत. कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरलेले नाहीत, कॅबिनेटची बैठक होते त्यावेळी हे झोपा काढत असतात. बाहेर मात्र आपल्यावर टीका करीत असतात त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे आपण अधिक खोलात गेलो तर त्यांना जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही,’ असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षाचे  उन्मेश पाटील यांनी दिला आहे.

शहरातील हॉटेल के पी प्राईड येथे आज पत्रपरिषदे बोलविण्यात आली होती. यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित होते. पत्रपरिषदेत माहिती देतांना उन्मेश पाटील म्हणाले, ’जिल्हा बँकेत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय महाजन घेत आहेत. मग त्यांनी आता शेतकऱयांच्या कर्जाचा आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांचा जो प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मंत्री म्हणून याकडे मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत. जिह्यातील 21 हजार शेतकरी आणि साडेतीनशे गटसचिवांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱयांना प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले. अमित शहा त्या खात्याचे मंत्री आहेत. ते शेतकऱयासाठी निर्णय घेत असतांना जिह्यातील मंत्री मात्र त्यांच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आहेत.