झोपेवर लक्ष ठेवेल छोटी रिंग

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने एका छोटय़ा गॅलेक्सी रिंगला टीज केले. ही रिंग छोटी दिसत असली तरी ही स्मार्ट कामे करणारी आहे. या रिंगद्वारे हार्ट रेट, स्लीप ट्रकिंगसारख्या हेल्थ ऑक्टिविटीला मॉनिटर करता येणार आहे. ही स्मार्ट रिंग वर्षाच्या अखेरपर्यंत वेगवेगळ्या मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.कंपनीने या रिंगच्या किमतीची अद्याप घोषणा केली नाही. दुसरीकडे सॅमसंगला टक्कर देण्यासाठी अॅपल कंपनीही स्मार्ट रिंग बाजारात आणण्याच्या तयारीला आहे. याबाबत ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे.