वेगाने पसरतोय ‘आय फ्लू’, जाणून घ्या कारणे आणि उपाय

कंजक्टिवायटिस या आजाराला आय फ्लू या नावानेही ओळखले जाते. पावसाळा आणि हवामानातील बदल यामुळे विषाणुचा धोका वाढून आय फ्लूचा संसर्ग होऊन या आजाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. याला वैद्यकीय भाषेत गुलाबी डोळा किंवा ‘डोळे येणे’ असेही म्हटले जाते. डोळ्यात खाज येणे, डोळे दुखणे, सूज येणे, डोळ्यातून पाणी येणे…या समस्या असल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे आवश्यक आहे.

डोळे आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आल्याने किंवा विषाणुने दूषित झालेल्या वस्तूंना स्पर्शन केल्याने हा आजार पसरू शकतो. हा विषाणू संसर्गजन्य आहे. सहसा 1 ते 3 आठवड्यांत कंजक्टिवायटिस हा आजार आपोआप बराही होतो. डोळे येण्याची समस्या उद्भवल्यास स्वत:हून औषधोपचार करणे टाळावे. लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. ते डोळ्यांची स्थिती पाहून त्यावरील औषधे रुग्णाला देतात.

डोळे येण्याची कारण
धुळीचे कण, पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील कोंडा किंवा एखाद्या विशिष्ट रसायनांसारख्या ऍलर्जीमुळे कंजक्टिवायटिसचा त्रास होतो. तलावातील पाण्यात आढळणाऱ्या क्लोरिनमुळेही हा आजार होऊ शकतो तसेच या आजारात व्यक्तिच्या दोन्ही डोळ्यांवर परिणाम होतो. तीव्र खाज सुटणए, लालसरपणा, काही वेळा ठेंगणे झाल्याची लक्षणे या आजारात दिसतात. यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीहिस्टामाइन आय ड्रॉप्स वापरल्याने आराम मिळू शकतो.

संसर्ग होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?
– पावसाळ्यात आय फ्लूचा धोका वाढतो. त्यामुळे या दिवसांत स्वच्छतेची काळजी घ्यावी. हात नियमितपणे साबणाने स्वच्छ धुवावेत.
– हा संसर्ग हातांनी पसरतो. त्यामुळे घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.
– टॉवेल, टूथब्रश आणि मेकअपच्या वस्तू इतरांना वापरायला देऊ नयेत.
– सार्वजनिक ठिकाणी गेल्यास डोळ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी दरवाजाचे हँडल किंवा कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करणे टाळावे. किवा या वस्तूंना हात लावल्यास साबणाने हात धुवावेत.
– डोळ्यांना डार्क चष्मा किंवा सनग्लासेस लावावेत. यामुळे डोळ्यांचा फ्लू टाळता येऊ शकतो.

उपचार कसे कराल ?
डोळे येण्याची लक्षणे आढळल्यास डोळे त्वरित स्वच्छ थंड पाण्याने धुवावेत आणि तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण रसायनांमुळे जास्त नुकसान होऊ शकते. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे. या आजारात रुग्ण 7 ते 14 दिवसांत बरा होतो. ऋतुमानानुसार, या संसर्गजन्य आजारावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बॅक्टेरियल कंजक्टिवायटिस, अॅलर्जी कंजक्टिवायटिस, एलर्जी कंजक्टिवाइटिस, रासायनिक कंजक्टिवायटिस असे डोळे येण्याचे काही प्रकार आहेत.

गॉगल लावल्याने फायदा होतो का ?
डोळ्यांवर गॉगल लावल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते. डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळ्यांमध्ये टोचल्यासारखे होणे असे त्रास कमी होतात. गर्दीच्या ठिकाणी किंवा कार्यालयात गॉगल वापरला तर डोळे येण्याच्या समस्येवर संसर्ग थांबायला मदत होऊ शकतो, हा गैरसमज आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.