तीस वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक दावा, त्याने मला…

अभिनेत्री सुचिता कृष्णमूर्ती हिने तिच्यापेक्षा 30 वर्षांनी मोठ्या असलेला दिग्दर्शक शेखर कपूर याच्यासोबत लग्न केले होते. त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्न झाले तेव्हा सुचित्रा 19 वर्षांची होती तर शेखर हे तिच्या आईच्या वयाचे म्हणजेच 49 वर्षांचे होते. मात्र सुचित्राने सर्वांचा विरोध पत्करत शेखऱ कपूर यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांना एक मुलगीही आहे. 2007 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. इतक्या वर्षांनंतर सुचित्राने त्यांच्या नात्याबाबत धक्कादायक दावा केला आहे.

”माझ्या नवऱ्याला मी अभिनय करू नये असं वाटत होतं. मी देखील अभिनय क्षेत्राशी संबंधित नसलेल्या कुटुंबातून असल्यामुळे तेव्हा मला देखील त्यात फार काही वावगं वाटलं नाही. माझ्या कुटुंबियांनाही मी या क्षेत्रात येऊ नये असं वाटत होतं पण मी त्यांचं ऐकलं नव्हतं. पण शेखऱने सांगितल्यानंतर मी ऐकलं. मी त्यावेळी आपल्याला काम न करू सांगणाऱ्या व्यक्तीच्या वैचारिक पातळीचा मी विचार करण्याइतपत मोठी नव्हते, असे सुचित्राने एका मुलाखतीत सांगितले.

”माझ्या आई वडिलांचा आमच्या लग्नाला विरोध होता. लग्नाच्या वेळी शेखऱ माझ्या आईच्या वयाचा होता. त्यामुळे माझ्या पायाजवळ बसून लग्न करू नको म्हणून विणवण्या करत होती. पण मी कुणाचंच ऐकलं नाही आणि लग्न केलं”, असं सुचित्राने सांगितलं.

”आमच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी दोघांमध्ये मतभेद होऊ लागले होते. मी ते लग्न मोडणार होते. मात्र त्याच वेळी मी गरोदर राहिले. मला वाटलं नशीबाने काही वेगळं ठरवलं असेल. त्यामुळे मी काही वर्ष तिथे राहिले पण नंतर मात्र मी तिथून बाहेर पडले. मला आणखी सहन करणं शक्य नव्हतं. त्याने मला धोका दिला होता”, असे सुचित्राने सांगितले.