अंतराळाचा अभ्यास

>> सुदाम कुंभार (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)

अंतराळ संशोधन या विषयाची व्याप्ती मोठी आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल आज माहिती घेऊ या.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-3’ ची यशस्वी करणाऱया शास्त्र्ाज्ञांचे कार्य प्रेरणादायी आहे. देशातील होतकरू आणि संशोधनाची आवड असलेल्या तरुणांनी अंतराळातील संशोधन करण्यासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रो) आपण कशाप्रकारे प्रवेश करू शकतो किंवा आपले करीअर करू शकतो याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी) संस्थेमध्ये पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोस्पेस इंजिनीअरिंग.
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/अव्हिओनिक्स. दुहेरी पदवी घेण्यासाठी बीटेक इन इंजिनीअरिंग फिजिक्स मास्टर ऑफ सायन्स किंवा पुढीलपैकी एका विषयातून एमटेक
मास्टर ऑफ सायन्स इन ऍस्ट्रॉनॉमी ऍण्ड ऍस्ट्रो फिजिक्स
मास्टर ऑफ सायन्स इन सॉलिड स्टेट फिजिक्सl मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन अर्थ सिस्टम सायन्स
मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन ऑप्टिकल इंजिनीअरिंग

प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया
ऑनलाइन फॉर्म भरण्यासंबंधी माहिती मे 2024 पहिला आठवडा.
साधारण जून 2024 च्या पहिल्या आठवडय़ापासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होते.
गुणवत्ता यादी जाहीर तसेच तुम्ही भरलेल्या शाखांच्या पसंतीमध्ये बदल करण्यासाठी साधारण जुलै 2024.
प्रवेश फेरी जुलै/ऑगस्ट 2024.
आयआयएसटी संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश ऑगस्ट 2024.
आवश्यकता भासल्यास स्पॉट ऍडमिशन ऑगस्ट 2024.
प्रवेश प्रक्रिया पूर्ण ऑगस्ट 2024.
प्रत्यक्ष वर्गांची सुरुवात सप्टेंबर 2024.
अधिकची माहिती https://www.iist.ac.in या वेबसाइटवरून घेऊ शकता.
आयआयएसटीमध्ये विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबर एरोस्पेस इंजिनीअरिंग, एव्हिओनिक, केमिस्ट्री, अर्थ ऍण्ड स्पेस सायन, ह्युमॅनिटीज, मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स या सात क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याची संधी मिळते.
आयआयएसटीमधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा सीजीपीए स्कोर हा 7.5 पेक्षा जास्त असतो, त्यांना ‘इस्रो’मध्ये प्लेसमेंट मिळण्याची शक्यता जास्त असते.

2024 सालच्या प्रवेशाचे निकष काय…
देशाचे नागरिकत्व
इयत्ता 12 वी (विज्ञान शाखेतून) किमान 75 टक्के (आरक्षित प्रवर्गासाठी 65 टक्के) गुणांसह गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी भाषेसह उत्तीर्ण.
1 ऑक्टोबर 1999 नंतर जन्माला आलेले विद्यार्थी.
अर्ज करतेवेळी विद्यार्थ्यांकडे जेईई ऍडव्हान्स 2024 परीक्षेचे वैध गुणपत्रक असणे आवश्यक आहे.