मराठा आरक्षणासाठी 6 दिवसांत 19 लाख 66 हजार घरांचे सर्वेक्षण, 2 लाख 69 हजार 495 जणांचा माहिती देण्यास नकार

मुंबई महापालिकेकडून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सहा दिवसांच्या सर्वेक्षणात आतापर्यंत 19 लाख 66 हजार 926 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 23 ते 28 जानेवारी या सहा दिवसांत 2 लाख 69 हजार 495 घरांनी सर्वेक्षणाला नकार दिला तर 5 लाख 70 हजार 984 मुंबईकरांच्या घरांना टाळे होते, अशी माहिती सर्वेक्षणात समोर आली आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. 31 जानेवारीपर्यंत 39 लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांतील 30 हजार कर्मचाऱयांवर सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे. 23 जानेवारी पहिल्या दिवशी 2 लाख 65 हजार 120 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले तर 28 जानेवारीला सहाव्या दिवशी 3 लाख 88 हजार 702 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

23 ते 28 जानेवारीदरम्यान सर्वेक्षण

23 जानेवारी 2 लाख 65 हजार 120
24 जानेवारी 5 लाख 39 हजार 488
25 जानेवारी 6 लाख 73 हजार 883
26 जानेवारी 4 लाख 54 हजार 923
27 जानेवारी 4 लाख 85 हजार 402
28 जानेवारी 3 लाख 88 हजार 702