तमन्ना भाटियाची बहुचर्चित वेबसिरीज ‘आखरी सच’ चा ट्रेलर लाँच

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या चांगलीच चर्चेत आहे. तमन्नाच्या बहुचर्चित ‘आखरी सच’ या वेबसिरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. ‘थलैवा’ रजनीकांतसोबतचा तिचा अलीकडील तमिळ सिनेमा ‘जेलर’च्या यशामुळे आणि मेगास्टार चिरंजीवी ‘भोला शंकर’ यांच्यासोबतचा तिचा तेलगू सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये तिची क्रेझ वाढली आहे.

या वेब सीरिज मध्ये तमन्ना मुख्य तपास अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. तमन्ना म्हणते “जेव्हा ‘आखरी सच’ ही वेबसिरीज माझ्याकडे आली तेव्हा या कथेने माझे मन जिंकले. हे पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. मी पहिल्यांदाच एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ही वेबसिरीज जिस्ने + हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

फिल्म्स निर्मित आणि रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित ही मालिका सौरव डे यांनी लिहिली आहे. अभिनेत्री अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग, दानिश इक्बाल, निशू दीक्षित, क्रिती विज आणि संजीव चोप्रा यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. ‘आखरी सच’, ‘जेलर’ आणि ‘भोला शंकर’ व्यतिरिक्त अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. मल्याळममध्ये ‘बांद्रा’, तमिळमध्ये ‘अरनामनाई 4’ आणि जॉन अब्राहमसह हिंदीमध्ये ‘वेदा’ या सिनेमांमध्ये ती दिसणार आहे.