झोपडपट्टय़ांच्या कंत्राटदाराकडून स्वच्छतेचा उपक्रम गुंडाळणार; कंत्राटदार मिळेना, निविदेला पाचव्यांदा मुदतवाढ

मुंबईतील झोपडपट्टय़ांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमण्याचा पालिकेचा उपक्रम आता गुंडाळण्याची शक्यता आहे. कारण पंधराशे कोटींच्या कामासाठी चार वेळा निविदा मागवूनही कंत्राटदारच समोर येत नसल्याने आता पाचव्यांदा निविदा मागवण्यात आल्या आहेत. यानुसार 31 एप्रिलपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात 60 टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करतात. त्यामुळे झोपडपट्टी कचरा मुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या धोरणानुसार विशेषतः झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी, स्वच्छतागृहांची, गटारांची स्वच्छता कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी पहिल्यांदा 15 फेब्रुवारी रोजी निविदा मागवण्यात आल्या. परंतु निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने 11 मार्च रोजी मुदतवाढ एक आठवडय़ाची मुदतवाढ दिली. मात्र त्या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र या वेळी कोणच कंत्राटदार पुढे न आल्याने 25 मार्चपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. मात्र तिसऱयांदा निविदा प्रक्रियेला 3 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तरीही पंत्राटदार पुढे येत नसल्याने चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र पंत्राटदार समोर येत नसल्याने आता पाचव्यांदा निविदा मागवण्यात आली आहे.

अशी राहणार पंत्राटदारांवर जबाबदारी

 n झोपडपट्टी भागातील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. n झोपडपट्टी वस्तीमधील गल्ल्यांची सफाई, छोटय़ा गटारांची सफाईची जबाबदारी त्याच कंत्राटदारावर राहील. n झोपडपट्टी भागातील  स्वच्छतागृहांची स्वच्छता दिवसातून दोन ते तीन वेळा कारवी लागेल.