आता सूरज आणि तान्या

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथील प्राणीसंग्रहालयात सिंहाचे नाव अकबर आणि सिंहिणीचे नाव सीता ठेवण्यात आले होते. मात्र यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. विश्व हिंदू परिषदेने ही नावे बदलण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर राज्य सरकारने आता त्यांच्या नव्या नावांची घोषणा केली आहे. सिंहाचे नाव सूरज आणि सिंहिणीचे नाव तान्या ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी करताना विवाद निर्माण करणारी नावे देणे टाळण्याची सूचना केली. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने प्राधिकरणला नवी नावे पाठविली होती.