पुढील वर्षी प्रवासी वाहनविक्री वाढणार

पुढील आर्थिक वर्षात प्रवासी वाहन विक्री  या वर्षाच्या तुलनेत पाच ते सात टक्क्यांनी वाढेल, असे ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा एसयुव्ही म्हणजे स्पोर्ट्स युटिलिटी वेईकलचा असेल. 2023-24 या वर्षात प्रवासी वाहनांची विक्री सहा ते आठ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यावर्षाअखेरीस एसयुव्ही विक्रीचे प्रमाण 60 टक्के असेल असा अंदाज आहे. या गाडय़ांच्या किमती तुलनेने कमी असल्याने आणि या प्रकारात नवनवीन मॉडेल बाजारात दाखल होत असल्याने त्यांना मागणी आहे. एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रिक पर्यायही उपलब्ध आहेत. यंदा प्रवासी वाहनांच्या निर्यातीत घट होऊन ती 14 टक्क्यांवर येईल असा अंदाज आहे.