मध्य रेल्वेवर दोन दिवसांचा रात्रकालीन विशेष ब्लॉक

मध्य रेल्केकरील सीएसएमटी येथील पायाभूत कामांसाठी दोन दिकसीय रात्रकालीन किशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार-शनिवारी आणि शनिवारी-रविवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत (दोन्ही दिवशी प्रत्येकी 4 तास) भायखळा–सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर, वडाळा रोड–सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. या कालावधीत लोकल सेवा उपलब्ध नसतील.