उर्मिला मातोंडकरने मानले अस्सल हिंदुस्थानींचे आभार, हा फेकू ट्रोलर्सवरचा विजय

गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि सतत बेताल वक्तव्य करुन चर्चेत राहणारी कंगना राणावत यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. या वादात ज्यावेळी कंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणत हीन पातळी गाठली; त्यावेळी अनेकजण उर्मिलाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. या सर्व समर्थकांना ‘अस्सल हिंदुस्थानी’ असे संबोधून उर्मिलाने आज त्यांचे आभार मानले. मात्र त्याचवेळी सोशल मीडियावरील ‘ट्रोल’ धाडीला फटकारताना हा फेकू ट्रोलर्सवरचा विजय असल्याचे ट्विट तिने केले. उर्मिलाचे हे ट्किट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

उर्मिलाच्या या ट्विटवर अनेकजण भरभरून कमेंट करत आहेत. अनेकांनी सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल तिचे आभार मानले तर अनेकांनी आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. फेक मीडियाच्या जाळ्यापासून वाचलं पाहिजे. वाईटावर नेहमीच चांगल्याचा विजय होतो, असेही अनेकांनी लिहिलं आहे. कालपासून बॉलीवूडचे अनेक कलाकार तिच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत.

अस्सल हिंदुस्थानींचे आभार. मला साथ देणाऱया निष्पक्ष तसेच प्रतिष्ठत मीडियातील (दुर्मिळ वंशांच्या) व्यक्तींना मी मनापासून धन्यवाद देते. फेक आयटी ट्रोलर आणि त्यांच्या प्रचाराविरोधात हा तुमचा विजय आहे. तुमच्या पाठिंब्याने मी खूप भारावून गेलेय…

जय हिंद!

आपली प्रतिक्रिया द्या