पराभवाच्या भीतीने भाजपकडून कॉँग्रेस उमेदवारांचा छळ – वडेट्टीवार

रामटेक मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे या निवडणुकीत पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात भाजपकडून साम दाम दंड भेद सूत्राचा वापर केला जात आहे. सरकारी यंत्रणांचे निष्पक्ष वागणे अपेक्षित असताना यंत्रणा या विरुद्ध आचरण करत आहे. पराभवाच्या भीतीने भाजपकडून कॉँग्रेस उमेदवारांचा छळ सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. कायद्यानुसार 17 फेब्रुवारी 2020ला रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते. त्यामुळे जात पडताळणी समितीला हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीने अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हा निकाल दिला आहे. त्यामुळे या समितीवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.