Video मिंधेंचा ‘प्रताप’, शिवजयंतीच्या कार्यक्रमात भोजपूरी गाण्यांवर नाचवल्या महिला

28 मार्चला राज्यभर तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. अनेक ठिकाणी शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील मीरा भाईंदर  येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र या कार्यक्रमातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. साऱ्या जगाचे राजे असलेल्या महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मिंध्यांनी विचित्र गाण्यांवर महिलांना नाचवले. या महिला बारबाला असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात शिवजयंतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एक महिला भोजपूरी गाण्यावर नाचताना दिसत आहे. सदर महिला डान्स करत असताना एक तरुण तिथे येऊन तिच्या हातात पैसे देऊन जातो. पण शिवजंयतीच्या कार्यक्रमात हे कसले फालतू प्रकार केले जात असल्याची टीका लोकांकड़ून करण्यात आली. अनेकांनी प्रताप सरनाईक यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.