जोगेश्वरीतून शिवसेनेला भरघोस मताधिक्य मिळेल! उत्तर-पश्चिम मुंबईचे समन्वयक विलास पोतनीस यांचा विश्वास 

जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा अभेद्य गड आहे. स्वर्गीय राजेश्वर रागिनवार, देविदास साळशिंगरीकर, कांता गावडे, दामोदर कवठणकर यांनी या गडाचा पाया उत्तमरीत्या तयार केला आहे. जोगेश्वरीतील आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत. त्यामुळे येणाऱया लोकसभा निवडणुकीत जोगेश्वरीतून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना भरघोस मताधिक्य मिळेल, असा विश्वास मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना समन्वयक आमदार विलास पोतनीस यांनी व्यक्त केला.

जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखा क्र. 73, 74, 77, 79 मधील सर्व पुरुष व महिला उपशाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच युवा व युवती सेना यांची बैठक आमदार विलास पोतनीस यांनी बाल विकास मंदिर शाळेचे सभागृह शिवसेना शाखेशेजारी, जोगेश्वरी (पूर्व) येथे घेतली. तसेच शाखा क्र. 52, 53 यांची बैठक शिवसेना शाखा गोकुळधाम येथे आणि शाखा क्र. 72, 78 मधील पदाधिकाऱयांची बैठक जैन मंदिर हॉल, जोगेश्वरी पूर्व येथे घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, महिला विभाग संघटक साधना माने, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत, उपविभागप्रमुख जयवंत लाड, जितेंद्र वळवी, पदाधिकारी भाई मिर्लेकर, रवींद्र साळवी, राहुल देशपांडे, मयूरी रेवाळे, सुगंधा शेट्टये, नीलाक्षी भाबल, माजी नगरसेवक बाळा नर, रवींद्र साळवी, पैलासनाथ पाठक, दीपाशा पवार, शीला येरागी, लोना रावत, स्मिता साळशिंगरीकर, जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघामधील सर्व शिवसेना पुरुष व महिला शाखाप्रमुख, शाखा संघटक, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख मोठय़ा संख्येने उपस्थित होते.