मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नगर शहरातील काही मार्ग वाहनांसाठी बंद; नागरिकांची गैरसोय

यवतमाळमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये सोमवारी महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. सोमवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये नगर शहरातील मुख्य रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत आदेशही काढण्यात आले आहेत. नगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोघे उपमुख्यमंत्री नगरमध्ये येत आहेत. तसेच ते महायुतीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही उपस्थित राहणार आहेत.

यवतमाळमध्ये घडलेली घटना विचारात घेता नगरमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. ज्या ठिकाणाहून ही रॅली जाणार आहेत ते शहरातील मुख्य रस्ते असल्यामुळे या रस्त्यावर दुचाकी वाहने, चारचाकी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. या मार्गाने कोणतेही वाहन जाणार नाहीत, याबाबतची दक्षता घेण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये या मार्गावर कोणतीही वाहने जाणार नाही अशी दक्षता घेण्याच्या आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे नगर शहरांमध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये जाण्याचे मार्ग बंद राहणार आहेत.