नॅशनल पार्कमधील 5 कोटींचे रस्ते काम महापालिकेच्या माथी, वन विभागाच्या कामाचा पालिकेला फटका

राज्य सरकारकडून मुंबईतील कोटय़वधींची अनेक कामे पालिकेवर ढकलत असताना आता पुन्हा एकदा वन विभागाचे 5 कोटींच्या रस्त्याचे काम पालिकेवर सोपवण्यात आले आहे. यामध्ये पालिका बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत ताम्हणी पाडा प्रकेशद्वार ते कान्हेरी गुंफापर्यंतचा रस्ता, लाँगहंट ते कान्हेरी चौकीपर्यंतचा रस्ता आणि राष्ट्रीय उद्यानाचे प्रकेशद्वार ते कान्हेरी गुंफा रस्त्यांकर थर्मे प्लॅस्टिक पेंटिंग ही कामे पालिकेच्या 5 कोटींच्या निधीतून करण्यात आली आहेत.
मुंबईत झालेल्या जी-20 परिषदेसाठी उपस्थित प्रतिनिधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफेला भेट देणार होते. 16 डिसेंबर 2022 रोजी ही नियोजित भेट झाली. वन विभाग व पालिकेचे अधिकारी त्यास हजर होते. या बैठकीत राष्ट्रीय उद्यानातील अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वार तसेच येथील रस्त्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळ कमी असल्याने रस्ते दुरुस्ती व सुधारण्याचे काम करणे शक्य नसल्याने, शिवाय मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीचा वन विभागाकडे अभाव असल्याने या रस्त्यांची सुधारणा पालिकेने करावी अशी विनंती वनरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी पत्र पाठवून पालिकेला केली होती, यानुसार ही कामे करण्यात आली होती.

निविदा न काढताच काम

ही कामे तातडीची असल्याचे सांगत निविदा न काढताच करण्यात आली. याआधी कंत्राटदाराला गोराईतील कामांसाठी किकिध करांसह सुमारे 111 कोटींचे कंत्राट दिले होते. त्यात आणखी 5.16 कोटी काढकून देऊन राष्ट्रीय उद्यानातील काम करून घेण्यात आले आहे.

अशी झाली कामे

राष्ट्रीय उद्यान भेटीच्या निमित्त लेफ्टनंट कर्नल उदय सिंह यांनी पालिकेच्या परिमंडळ-7 चे उपायुक्त यांच्यासमकेत केलेल्या पाहणीमध्ये उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते कान्हेरी गुंफा आणि कान्हेरी गुंफा ते लाँग हंटपर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐकजी सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोरिवलीतील गोराई गाकात रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून कान्हेरी गुंफा परिसरातील रस्त्यांची सुधारणा करून घेतली होती.