उच्चवर्णीयांच्या शाळेत पाणी प्यायला; 8 वर्षांच्या दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण

 

 

जातीपातीतील भेदभावामुळे एका आठ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना राजस्थानातील अलवार जिह्यात घडली. खेळता खेळता प्रचंड तहान लागल्यामुळे हा चिमुरडा उच्चवर्णीयांच्या शाळेतील हातपंपावर जाऊन भरण्यासाठी लावलेले भांडे बाजूला करून पाणी प्यायला. त्यामुळे चिडलेल्या एकाने या मुलाला जबर मारहाण केली. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी मारहाण करणाऱयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चिराग असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो चौथीत शिकतो. चिरागला खेळता खेळता प्रचंड तहान लागली म्हणून तो एका शाळेतील हातपंपावर गेला. तिथे आरोपी रतीराम ठाकूर हा त्याचे भांडे भरत होता. तहानेने व्याकूळ झालेल्या चिरागने ते भांडे बाजूला केले आणि पाणी पिऊ लागला. त्यामुळे चिडलेल्या ठाकूरने चिरागला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे चिरागचे वडील पन्नालाल यांनी सांगितले.