सीबीएसईचा नवा अभ्यासक्रम

सीबीएसई बोर्डाने शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नववी ते बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नववी, दहावीला तीन भाषा आणि अकरावी, बारावीसाठी दोन भाषा विषय अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत एनसीईआरटीकडून पाठय़पुस्तकांची छपाई पूर्ण होत नाही तोपर्यंत नववी, दहावीला दोन तर अकरावी, बारावीसाठी एक भाषा विषयच अनिवार्य असणार आहे. 1 एप्रिलपासून सीबीएसईचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यापूर्वी बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम जाहीर केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असतील. यासोबतच 2 ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत.