19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत निवडणूक आयोगाची एक्झिट पोलवर बंदी

देशात लोकसभा आणि चार राज्यांतील विधानसभांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत कुठल्याही एक्झिट पोलचे आयोजन, प्रकाशन किंवा प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मतदान समाप्तीसाठी निश्चित वेळेबरोबर संपणाऱया 48 तासांच्या अवधीत कोणत्याही स्वरूपाचे निवडणूक विषयक तपशील प्रदर्शित करण्यास चॅनेल वा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियालाही याच अधिसूचनेद्वारे बंदी घालण्यात आली आहे.