पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

 

अनेक वर्षांपासून पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याकांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. पाकिस्तानात धर्मांतर आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदू मुलगी प्रिया कुमारीचे सुक्कूर येथून अपहरण करण्यात आले. मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही. या प्रकरणावरून सध्या पाकिस्तानातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डेरा मुराद जमाली शहरात अल्पसंख्याकांनी नुकताच मोर्चा काढला. हिंदू नागरिकांनी आणि व्यापाऱयांनी अपहरणाचा निषेध करत हिंसक आंदोलन केले.

अनेक दिवस उलटूनही प्रिया कुमारीचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. परिणामी मुखी मानक लाल आणि सेठ तारा चंद यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी फेरी काढली. यामध्ये पाकिस्तानातील अल्पसंख्याक मोठय़ा संख्येने सहभागी झाले. प्रिया कुमारीचा तपास लवकर लागला नाही आणि हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

 

तपासात दिरंगाई

प्रिया कुमारीप्रकरणी सिंध प्रांताच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार तीन आठवडय़ांच्या आत अहवाल सादर करण्यासाठी संयुक्त तपास पथकाची स्थापना केली. राष्ट्रीय बाल हक्क आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू करण्यासाठी पोलीस विभागाला पत्र लिहिले होते. ‘ह्युमन राईट्स पह्कस पाकिस्ताननेही देशातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक छळाचा तीव्र निषेध केला आहे