नगरमध्ये परिवर्तनाची लाट, लंके यांचा विजय पक्का; विखेंची सरंजामशाही संपणार, ओपिनियन पोलचा निष्कर्ष

ahilya-nagar-ahmednagar-lok-sabha-constituency

बहुतेक सर्व वाहिन्या आणि संस्थांच्या सर्व्हेमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके निवडणूक जिंकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नगर दक्षिण मतदारसंघाला विखे-पाटील घराण्याच्या सरंजामशाहीतून मुक्ती मिळेल, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी 1 एप्रिलपासून मतदारसंघात ‘स्वाभिमान जनसंवाद यात्रे’द्वारे मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या यात्रेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अगदी विरोधी गटातील अनेक मातब्बर मंडळींनी तुतारी हाती घेऊन लंके यांचे हात बळकट केले आहेत. या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांच्या सर्व्हेनुसार नगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके हे सुजय विखे यांचा पराभव करतील, अशी शक्यता वर्तवली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विखे-पाटील घराण्याने नगर जिह्यावर निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. स्वतः बाळासाहेब विखे-पाटील हे अनेक वर्षे खासदार होते. याखेरीज त्यांनी केंद्रीय मंत्रिपददेखील भुषविले आहे. स्वतः राधाकृष्ण विखे-पाटील हे अनेक वर्षांपासून आमदार असून, ते विद्यमान सरकारमध्ये महसूलमंत्री आहेत. तरीही विकासाच्या नावावर जिह्यामध्ये काहीही भरीव होताना दिसत नाही. यामुळेच यंदाची निवडणूक जनतेने हाती घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे.