मराठा आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार

आंतरवाली सराटी येथे 24 मार्च रोजी मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आली असून यात आरक्षणासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मनोज जरांगे-पाटील यांची विक्रमी सभा झाली होती तेथेच ही बैठक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदरच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, सगेसोयऱयांचा अध्यादेश तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागण्यांचा जरांगे यांनी ठिकठिकाणच्या सभेत पुनरुच्चार केला, परंतु राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. उलट मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी येथे 24 मार्च रोजी मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.