पारंपरिक कबड्डी थरारासाठी मावळी मंडळ सज्ज

मावळी मंडळ म्हणजे कबड्डीचे प्रामाणिक वारकरी. कोणतेही संकट असो किंवा कोणतीही अडचण, अविरतपणे कबड्डीसाठी झटणारे हे मंडळ पुन्हा एकदा येत्या 5 ते 9 मेदरम्यान पारंपरिक कबड्डीच्या थरारासाठी सज्ज होत आहे. गेल्या 70 वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला कबड्डीच्या जेतेपदाचा दावेदार निवडला जाईल.

शतक महोत्सवी शिवजयंतीच्या उंबरठय़ावर असलेल्या मावळी मंडळाने आपल्या 71व्या राज्यस्तरीय पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेच्या सहभागासाठी राज्यातील शेकडो संघांना आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया या स्पर्धेत खेळण्यासाठी राज्यातील किमान 70 पेक्षा अधिक संघ ठाणे गाठतात. यंदाही या लाल मातीत खेळल्या जाणाऱया या स्पर्धेत त्यापेक्षा अधिक संघ सहभागी होणार असून स्पर्धेतील विजेत्यांवर अडीच लाखांपेक्षा अधिक रोख रकमांचे पुरस्कार वितरित केले जाणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह दिनेश मोरे यांनी दिली.

मावळी मंडळाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी राज्यातील संघ एका पायावर चढाई करायला तयार असतात. त्यामुळे या स्पर्धेचे दिमाखदार आणि सुनियोजित आयोजन व्हावे म्हणून चार क्रीडांगणांवर सामने खेळविले जातात. स्पर्धा बाद फेरीत खेळविली जाणार असून स्पर्धेचे सामने वेळेत संपविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही मोरे यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांनी मावळी मंडळ (ठाणे), राज्य संघटना (दादर), मुंबई शहर (वडाळा) आणि उपनगर कबड्डीच्या (कुर्ला)