कोल्हापुरात भाजप पदाधिकाऱयांकडून मिंधेंच्या खासदाराचा पाणउतारा

उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप कार्यालयात आलेले मिंधे गटाचे खासदार संजय मंडलिक यांचा भाजप पदाधिकाऱयांकडून चांगलाच पाणउतार झाला. यावेळी उपस्थित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनाही कानपिचक्या देण्यात आल्या. ‘मतदान करायला आम्ही आणि काम मात्र काँग्रेसवाल्यांची होणार, असे यापुढे चालणार नाही,’ अशा शब्दांत दम भरण्यात आला.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी शुक्रवारी सकाळी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात भाजप पदाधिकाऱयांची भेट घेतली; पण भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिंधे गटाचे खासदार संजय मंडलिक, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोरच, ‘भाजपच्या कोणत्या कार्यकर्त्यांची कामे केली आहेत, ते जाहीर सांगावे. कामाचे सोडा, मंडलिक यांचे स्वीय साहाय्यक पह्न उचलत नाहीत, नीट बोलत नाहीत,’  सांगत मंडलिक यांना चांगलेच धारेवर धरले.

खासदार महाडिक तातडीने दिल्लीला रवाना

भाजपचे राज्यसभा खासदार आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील स्टार प्रचारक धनंजय महाडिक या बैठकीनंतर तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पक्षश्रेष्ठाRनी तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याने भाजप या मतदारसंघात धक्का देईल का? यावरून महायुतीत पुन्हा धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे.