रामभक्तीआडून पियूष गोयल यांचा छुपा प्रचार

जाहिरातबाजी आणि जुमलेबाज जाहीरनाम्यानंतर भाजपकडून आता रामभक्तीच्या नावाखाली छुपा प्रचार सुरू असल्याचा प्रकार उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात समोर आला आहे. यात पियूष गोयल आणि पंतप्रधान नरेंद्र यांची प्रभू रामासह असलेल्या छायाचित्रांची पत्रके घराघरांत वाटली गेली आहेत. त्यावर ‘जिसने राम को लाया, उसको हम लायेंगे’ असा मजकूरही आहे. त्यामुळे रामभक्तीआडून गोयल यांचा छुपा प्रचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

देशभरात आज रामनवमीनिमित्त भक्तिमय, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मात्र भाजपकडून रामाच्या नावाखाली पक्षाचा प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पियूष गोयल यांनी आपल्या मतदारसंघात रामनवमीनिमित्त एक प्रभू रामाचा पह्टो, एक भगवा झेंडा आणि एक जाहिरातबाजीचे पत्रक वाटले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रामाला ओवाळतानाचा पह्टो आहे, तर त्याच अर्ध्या पानावर उमेदवार पियूष गोयल यांचा पह्टो आहे. भाजपचा हा प्रचार असल्याचे समोर आले   आहे.