Sadanand Date – एनआयएच्या प्रमुखपदी सदानंद दाते

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पॅडरचे 1990च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते हे पुन्हा केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. पेंद्र सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश जारी करत त्यांच्याकडे एनआयएच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. याआधीदेखील दाते केंद्रीय यंत्रणेत होते. प्रतिनियुक्तीवरून महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांच्याकडे नव्याने स्थापन झालेल्या मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आयुक्त पदाचा कार्यकाळ त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. त्यानंतर त्यांना महत्त्वाच्या अशा राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. तिथेच त्यांची पोलीस महासंचालकपदी बढतीदेखील झाली.

   सचोटीचा व प्रामाणिक अधिकारी अशी आपली पोलिस दलात ओळख निर्माण केलेल्या सदानंद दाते यांनी मुंबईचे सह पोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हे शाखेचे यशस्वी कामकाज केले होते. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात ते दहशतवाद्यांशी लढताना जखमी झाले होते. विविध स्तरावर केलेल्या कामाचा अनुभव त्याच्याकडे असून  दाते यांना आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.