तोतया पोलिसांच्या टोळीने केली साडेपाच कोटींची लूट, कुरियर व्हॅन अडवून पैसे पळवले

पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल साडेपाच कोटी रुपये लुटून फरार झालेल्या सहा दरोडेखोरांच्या शहापुर पोलिसांनी मोठय़ा शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत.  नाशिक – मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱया कुरिअर सर्व्हीसच्या एका पीक अप वाहनाला इनोव्हा कार आडवी घालून पीक अपमधील पैशाने भरलेल्या दोन गोण्या घेऊन दरोडेखोर फरार झाले होते. पहाटे साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

पिकअप गाडीमधील 5 कोटी 40 लाख रुपये क@श असलेल्या पॅकेटच्या दोन गोणी घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. याबाबत आज गुन्हा दाखल झाल्यानंतर शहापुरचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या पोलीस पथकाने वेगाने सूत्र फिरवीत दरोडेखोरांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.