वेब न्यूज – न सुटलेले कोडे

सध्या सर्वत्र आगामी होणाऱ्या सूर्यग्रहणाची चर्चा चालू आहे. हिंदुस्थानी ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वीवर सर्वात जास्त प्रभाव हा 28 नक्षत्रे आणि चंद्र, सूर्य, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू या नवग्रहांचा असतो असे मानले जाते. मात्र या ग्रहांच्या जोडीला युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हेदेखील तीन महत्त्वाचे ग्रह आहेत, ज्यांच्या संदर्भात फारशी चर्चा होताना दिसत नाही. हिंदुस्थानात युरेनसला ‘अरुण’, नेपच्यूनला ‘वरुण’ आणि प्लुटोला ‘यम’ नावाने ओळखले जाते, तर महाभारतात या ग्रहांचे वर्णन ‘युरेनस पांढरा’, ‘नेपच्यून गडद’ आणि ‘प्लुटो तीष्ण’ असे आढळते. युरेनस शनीप्रमाणे महाकाय आणि बर्फाळ असलेला हा सूर्यमालेतील 7 वा ग्रह आहे. सूर्यापासून त्याचे अंतर सरासरी 2 अब्ज 90 कोटी किलोमीटर इतके आहे. या अंतरावरून सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला 84 वर्षे लागतात. अनेक ठिकाणी याचा उल्लेख ‘हर्षल’ असादेखील आढळतो. नेप्च्यून- सूर्यमालेतील शेवटचा आठवा ग्रह आहे. हा ग्रह 164.80 वर्षात सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. विशेष म्हणजे हिंदू पुराणांमध्ये आणि रोमन तसेच ग्रीक पौराणिक कथांमध्ये देखील या ग्रहाला पाण्याची देवता म्हणून ओळखले जाते. तर ज्योतिषशास्त्रानुसार देखील हा ग्रह मीन या जल राशीचा स्वामी आहे. प्लुटोला सध्या ग्रहांच्या श्रेणीतून हद्दपार करण्यात आलेले आहे. सूर्यमालेतील शेवटचा ग्रह अशी त्याची ओळख. हा वायू ग्रह असल्याने निळसर रंगाचा दिसतो. या प्लुटोला स्वतःचे आठ उपग्रह आहेत. शून्याच्या 197 अंश खाली तापमान असलेल्या या ग्रहावर ताशी 200 किलोमीटर वेगाने चक्रीवादळे वाहत असतात. याच्यावर काळे, जांभळे आणि पांढरे डाग दिसून येतात, जे आजही एक न सुटलेले कोडे आहे.