दुसऱया महायुद्धातील बंकरचा होणार लिलाव

दुसऱया महायुद्धाच्या काळात वापरण्यात आलेल्या बंकरचा लिलाव इंग्लंडमध्ये होणार आहे. सुर्रे भागात असलेल्या या बंकरची किंमत सुमारे दोन कोटी रुपये लावण्यात आली आहे. महाभयंकर युद्धाचे साक्षीदार असलेले बंकर 2.1 एकर जंगलासोबत मिळणार आहेत. हे बंकर विकण्याचा प्रयत्न मागील वर्षीही झाला होता. मात्र तीन लाख पाऊंडमध्ये ते खरेदी करण्यात कुणी रस दाखवला नाही. त्यामुळे जमिनीसोबत त्यांची विक्री करण्याची योजना आखण्यात आली. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हे ‘फॉक्सवॅरेन’ बंकर म्हणून ओळखले जातात. असे म्हटले जाते की, हे बंकर फॉक्सवॅरेन एक्सप्रिमेंटल डिपार्टमेंटचे असावेत. हा महायुद्धाच्या काळातील गुप्त प्रोजेक्ट होता. तिथे नव्या शस्त्रास्त्रांचे प्रोटोटाईप तयार
केले जायचे.

 2050 किलोमीटरपर्यंत सुरक्षा पुंपण उभारले

आतापर्यंत 2050 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर सुरक्षा पुंपण उभारण्यात आले आहे. आता 1282 किलोमीटर रेल्वेमार्गावर सुरक्षा पुंपण उभारण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. यासाठी 624 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. दरम्यान, 404 किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे.