अबब! मीटर बॉक्समध्ये 10 फूट लांब अजगर!!

पावसाळ्यात अनेक सर्प अडगळीतील जागा शोधतात. असाच तब्बल 10 फूट लांबीचा रॉक पायथॉन जातीचा अजगर मालाड पश्चिमेकडील काचपाडा परिसरात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आढळला. विजेच्या मीटर बॉक्समध्ये अडकलेल्या या अजगराची सर्पमित्र अजिंक्य पवार यांनी सुखरूप सुटका केली.

हा अजगर दिसताच परिसरातील सर्वांचीच तारांबळ उडाली. याची माहिती सर्पमित्र अजिंक्य पवार यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी या अजगराची विजेच्या मीटर बॉक्समधून सुखरुप सुटका केली.

भक्ष्याला विळखा घालतो आणि गिळतो

10 फुटांचा हा अजगर रॉक पायथॉन प्रजातीतील असून हा बिनविषारी सर्प आहे. या अजगराचे शास्त्राrय नाव पायथॉन मोलुरस आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे तो सर्वप्रथम भक्ष्यावर झडप घालतो. त्यानंतर त्याच्या शरीराभोवती वेटोळे करून ते गुदमरेपर्यंत त्याला गच्च आवळतो. त्यानंतर डोक्याकडील भागापासून गिळतो.

n अजगरालाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा त्याला विजेचा शॉक लागू नये याची संपूर्ण काळजी घेत अजिंक्य यांनी अजगराची सुटका केली व जीवनदान दिले. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी हे काम केले.