पोटातून काढले 15 कोटींचे कोकेन

कोटे डिवोअर येथून मुंबईत आलेल्या प्रवाशाने पोटात लपवून आणलेले 15 कोटीचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जप्त केले आहे. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या पोटातून त्या कोकेनच्या 77 पॅप्सूल बाहेर काढल्या आहेत. परदेशातून तीन दिवसांपूर्वी प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला डीआरआयच्या अधिकाऱयाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने पोटातून कोकेन आणल्याची कबुली डीआरआयच्या अधिकाऱयांना दिली. जे.जे.तील डॉक्टरांनी त्याच्या पोटातून 77 कोकेनच्या पॅप्सूल बाहेर काढल्या. कोकेन तस्करीच्या मोबदल्यात त्याला काही रक्कम मिळणार होती.