लाचखोर डॉक्टरांचे रॅकेट उद्ध्वस्त

सीबीआयने दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात लाचखोरीचे मोठे रॅकेट उघड केले. यामध्ये रुग्णालयाच्या डॉक्टरांपासून लॅब कर्मचाऱयांपर्यंत अनेकांचा सहभाग आहे. आतापर्यंत नऊ जणांना अटक झाली.

राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली  खासगी कंपन्यांची वैद्यकीय उपकरणेच वापरायला सांगत आहेत आणि त्याबदल्यात त्या खासगी पंपनीकडून मोठी लाच घेत असल्याचे सीबीआयला समजले. एफआयआरनुसार, राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉ. पर्वतगौडा यांना अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.  याशिवाय रुग्णालयातील लॅबचा सीनियर टक्निकल प्रमुख रजनीश कुमार यालाही अटक झाली. सीबीआयने कार्डियोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. अजय राज, नर्स शालू शर्मा, लिपिक भुवल जैस्वाल आणि संजयकुमार गुप्ता यांनी अटक केली. सीबीआयने वैद्यकीय उपकरण विकणाऱया डीलर्स संबंधित 15 ठिकाणी धाडी टाकल्या. एफआयआरमध्ये नागपाल टेक्नॉलॉजीचे नरेश नागपाल, भारत मेडिकल टेक्नॉलॉजीचे भारत सिंह दलाल, सीनमेडचे संचालक अबरार अहमद, कलेक्शन एजंट विकास कुमार आदींची नावे आहेत.