जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात चकमक; 2 दहशतवादी ठार, 3 जवान जखमी

जम्मू आणि कश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत बुधवारी दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्यापही घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या 48 तासांतील ही दुसरी दहशतवादविरोधी कारवाई आहे.

राजौरी जिल्ह्यातील कालाकोट जंगलात गेल्या 48 तासांपासून दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे.

सुरुवातीच्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले असून कालाकोटच्या जंगलात घुसलेल्या दहशतवाद्याचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन तीव्र करण्यात आले आहे.