2024 मध्ये राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार

राहुल गांधी हेच 2024 मध्ये काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदावार असतील, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे. तसेच त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरून राहुल गांधी या नव्या नेत्याचा जन्म झाल्याचे म्हटले आहे.  कमलनाथ म्हणाले की, इतिहासात आजपर्यंत कोणीही ‘भारत जोडो’ इतकी मोठी पदयात्रा काढली नाही. या देशासाठी जेवढे बलिदान काँग्रेसने दिले, तेवढे अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने दिले नाही. राहुल गांधी हे सत्तेसाठी नाही, तर देशातील गरीब जनतेसाठी राजकारण करतात आणि देशातील जनता कोणालाही सत्तेत बसवू शकते. यावेळी 2024 मध्ये काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असेल, याबाबत विचारले असता,
2024 च्या निवडणुकीदरम्यान राहुल गांधी हे केवळ विरोधी पक्षाचा चेहरा नसेल, तर ते पंतप्रधानपदाचे उमेदवारदेखील असतील असे ते म्हणाले.