होय, माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ; टीका करणाऱ्या PM मोदींना शरद पवार यांनी सुनावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीका केली होती. शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत मोदींनी त्यांच्यावर भटकती आत्मा, अशी टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टिकेला आता शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत समाचार घेतला आहे. होय, मी अस्वस्थ आहे, असा भीमटोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

‘एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं. शरद पवारांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो, असं म्हणत Sharad Pawar यांनी मोदींच्या जुन्या वक्तव्याचा दाखला दिला आणि टोला लगावला. महाराष्ट्रामध्ये एक अंतरात्मा आहे. तो आत्मा अस्वस्थ आहे. गेल्या 45 वर्षे महाराष्ट्रात अस्वस्था निर्माण करतोय. सरकार अडचणीत आणतोय. आणि या आत्म्यापासून सुटका करून घेण्याची गरज आहे, असं काल त्यांनी सांगितल्याचं शरद पवार म्हणाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

पराभवाच्या भीतीने सत्ताधारी अस्वस्थ, तर सर्वसामान्यांना ईव्हीएमवर शंका; शरद पवारांनी भाजपवर डागली तोफ

त्यांचं (नरेंद्र मोदी) भाषण मी वाचलं. टीव्हीवरही घरी जाऊन ऐकलं. आत्मा अस्वस्थ आहे, हे खरं आहे. तो अस्वस्थ आहे मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर, लोकांच्या दुःखामुळे अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांची दुःख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यात काही गैर नाही. सध्या सबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रचंच करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मी 100 वेळा अस्वस्थ होईल, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं.

माझी साथ सोडणाऱ्यांना निवडणुकीनंतर तपास यंत्रणांचा जाच सहन करावा लागेल! शरद पवार यांचा सूचक इशारा