कांदाप्रश्नी आंदोलन केले म्हणून मी गुंड का? – नीलेश लंके

 

अलीकडेच विखे पिता-पुत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी भेट घेतल्याचा गवगवा त्यांनी केला. नगरच्या बाजार समितीमध्ये सत्कार स्वीकारात निर्यातबंदी उठविली गेली नसती तर मते मागण्यासाठी गेलो नसतो, अशी बतावणीही केली. निळवंडे, साकळाई, ताजनापूर या योजना झाल्या नाही, तर निवडणुकीचा अर्ज भरणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारे खासदार यांचे काम ‘खोटे बोल पण रेटून बोल’ असे आहे. त्यांचे काम मात्र शून्य आहे. विखे कुटुंबाने गेल्या 50 वर्षांत जिह्यात एखादा मोठा प्रकल्प आणला का? तरुणांना रोजगार मिळाला का? त्यांच्या घराकडे जाणारा नगर-मनमाड रस्ता त्यांना करता आला नाही, ते खासदार विकासाच्या काय गप्पा मारतात? मी कांद्याच्या भावासंदर्भात आंदोलन केले म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे मी गुंड का, असा सवाल लंके यांनी केला.

शेतकऱयांच्या प्रश्नावर संसद बंद पाडेल!

 मला एकदा संधी द्या, अशी भावनिक साद घालत शेतकऱयांच्या प्रश्नावर संसद बंद पाडली नाही तर नाव बदलेल, असे सांगत ‘जे बोलतो तेच करतो;  व जे करतो तेच बोलतो. दुसऱयाच्या खांद्यावर पंढरपूर करणारा मी नाही, असा टोला नीलेश लंके यांनी लगावला.