उद्योगविश्व – स्वस्त दागिन्यांसाठी नवा पर्याय पल्मोनाज

>>अश्विन बापट

दागिने म्हणजे महिलांचा विकपॉईंट! पण सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने इमिटेशन ज्वेलरी हा एक उत्तम पर्याय सोयीचा आहे. नकली दागिन्यांची काहीजणींना आलर्जी असते. शरीराला कोणतीही हानी न पोहोचवणारी ‘पल्मोनाज’ या इमिटेशन ज्वेलरी ब्रँडबद्दल सांगतेय पल्लवी मोहाडीकर पटवारी…

साजशृंगार हा तर समस्त महिलांच्या मनाचा हळवा कोपरा. दागिन्यांवर महिला वर्गाचं खास प्रेम, आस्था असते. नेमकी हीच बाब अचूक हेरत एका मराठी दांपत्याने दोन वर्षांपूर्वी पल्मोनाज नावाचा ब्रँड सुरू केला. याबद्दल ब्रँडच्या फाऊंडर आणि सीईओ पल्लवी मोहाडीकर-पटवारी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्या म्हणाल्या, याची प्रेरणा ‘कारागिरी’ या साडय़ांच्या ब्रँडपासून मिळाली आहे. माझे आजोबा विणकर होते. ते भंडारा जिह्यात पवनी गावात दोन हातमागांसह हे काम करत असत. घरात 11 मुलं आणि मोठं कुटुंब असल्याने त्यांचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आजोबांनी पेललेलं ते आव्हान माझ्यासाठी प्रेरणा होती. विणकरांच्या कौशल्याला, कामाला अपेक्षित श्रेय मिळत नाही म्हणून मी पुढे कारागिरी नावाचा डिजिटल साडी ब्रँड सुरू केला. पाच विणकरांपासून सुरुवात केली आणि नंतर हा आकडा 2500 विणकरांपर्यंत गेला. हा ब्रँड 2021 मध्ये मेन्सा कंपनीने विकत घेतला.

मी घ्घ्श् लखनौमधून एमबीए केलंय. ज्या क्षेत्रात फार कुणी शिरत नाही, तसंच जिथे प्रयोगशीलतेला वाव आहे, अशाच क्षेत्रात पाऊल टाकायला मला आवडतं. कारागिरीच्या मिशननंतर डेमीफाईन ज्वेलरीमध्ये मी पाऊल ठेवलं. दागिने माझा विकपाईंट! परंतु सध्या सोन्याचे चढे भाव आहेत. मग मी इमिटेशन ज्वेलरीकडे वळले. माझी स्कीन खूप सेन्सिटिव्ह असल्याने मला नकली दागिन्यांने रॅशेस येतात. शरीराला कोणतीही हानी न पोहोचवणारी उत्पादनं तयार करण्याचं ठरवलं. तिथूनच मध्यम मार्ग काढला आणि स्टर्लिंग सिल्व्हर, सर्जिकल स्टेनलेस स्टीलचा वापर केलेली ज्यावर 2.5
मापॉन सोन्याचा थर असलेले दागिने आम्ही तयार करायला लागलो. आजच्या घडीला जयपूरमध्ये दोन कंपन्यांशी आमचं टायअप आहे. तिथेच आमची प्रॉडक्ट तयार होतात. 45 जणांची टीम फक्त आमच्याच प्रॉडक्टसाठी काम करते तर, डिझायनिंग, मार्केटिंगसह पुढची प्रािढया पुण्यात होते. तिथे आमचे 25 कर्मचारी आहेत. देशामध्ये ठिकठिकाणी आमची उत्पादनं जातातच, शिवाय अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या एकूण 200 देशांमध्ये याची पी होते. डेली वेअर ज्वेलरी ही आमची खासियत आहे. त्यातही आमची मंगळसूत्रं खास लोकप्रिय आहेत. ज्याची किंमत तीन ते आठ हजार या रेंजमध्ये आहेत. सध्या आमची एकूण 1300 उत्पादनं आहेत आणि आम्हाला तो आकडा पाच हजाराच्या वर न्यायचा आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही आमची को-फाऊंडर आणि पार्टनर आहे. तिच्याशी निर्माण झालेलं आमचं नातं याचीही खूप मजेशीर गोष्ट आहे. आमचा नेकलेस परिधान करून तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात आमच्या ब्रँडचं नाव नव्हतं. मग आम्ही तिला टॅग करून हे आमचं प्रॉडक्ट असल्याची कमेंट केली. तिथेच आमच्या कंपनीशी श्रद्धाचं नातं जुळलं.

डेमीफाईन फॅशन प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी, तर पल्मोनाज हे आमच्या ब्रँडचं नाव आहे. यामध्ये पल्लवी या माझ्या नावातील ‘पल्’, पती डॉ. अमोल यांच्या नावातील ‘मो’ आणि आमची तीन वर्षांची कन्या अनाया हिच्या नावातील ‘ना’ अशी अक्षरं घेऊन ब्रँडचं नाव तयार केलं आहे. भविष्यात नऊ आणि 12 कॅरेटचे दागिने तसंच लॅब ग्रोन डायमंडचेही दागिने घडवायचा आमचा संकल्प आहे, असं पल्लवी यांनी सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)